- आधुनिक प्रेमगीत
- शनि शिंगणापूर
- द्रौपदीचा विजय
- बाई तुझी किंमत किती….
- ग्लॅमर गर्ल
- बिकिनी आणि पडदा
- निर्भया के दोषियों का अंत हो गया
- रोज नवा शकुनी
- पदोपदी विसंगती
- निर्भया का आक्रोश
- श्रद्धा आणि आफत
- ब्रेन वायरिंग च आज बदलते आहे
आधुनिक प्रेमगीत

वीकेंडमागुन चालले वीकेंड हे, प्रीतीचे न येई इमोशन
किती रोमॅंटिक पिक्चर पाहू न जाई पुढे हे रिलेशन
तरी बरे हाॅ़टेलचे शेअर करते मी टिप सह अर्धे बिल
लाज तुला थोडीही न वाटे न होते मनी काही चलबिल
मागता शालूजोड कधी तुज वाटते डील फार महागडं
मिनीस्कर्टही न आवडे तुला मी कुठे करु वरी तडजोड
तुला हवी फक्त मौज माझी नको संसाराचे टेन्शन
मला मात्र हवा तुझा पगार अर्धा वरुन पूर्ण पेन्शन
मला पटवाया फिरती भोवती छप्पन्न रोड रोमिओ
निवडीन त्यातलाच एक वा गटवीन कोणी यंग सीईओ
निर्णय घे लवकर तू आधीच झाला किती उशीर
होकार नकार दोन्ही मज चाले नको राहू परि अस्थिर
दे उत्तर उद्यापर्यंत तू नाही तर गेलास उडत
तुझ्याविना माझे काही न अडे नाही हे जगही बुडत
यावर आपले मत नोंदवा