श्रद्धा आणि आफत
तरुण आहोत आम्ही साक्षर लिव्ह इनची हिंमत असते
आभास हा सुखाचा अहो स्वातंत्र्याला ही किंमत असते
कशास हवे आशीर्वाद समाजाचे
थोरामोठ्यांना विचारणे कमीपणाचे असते
स्वकर्तृत्वावर अतिविश्वास धोक्याचा
तरीही सगळ्यात मोठे मी पणच असते
आभास हा सुखाचा अहो स्वातंत्र्याला ही किंमत असते
दोन जीवांबरोबर जोडला जातो समाज
प्रेम जिव्हाळा संयम हे तर संमत नसते
मन्नत स्वतःचीच करण्यासाठी पुरी
रेखाटलेल्या चित्रामध्ये फक्त जन्नत दिसते
आभास हा सुखाचा अहो स्वातंत्र्याला ही किंमत असते
आयुष्याच्या वळणावर खाचखळग्यांच्या रस्त्यावर
हातातला हात नकळतच निसटतो
पाठीवर नसते आता अनुभवांची शिदोरी
झिडकारलेल्या नात्यांमुळे तुटते परतीची ही दोरी
परीक्षा आता फक्त एकटीचीच असते
आभास हा सुखाचा अहो स्वातंत्र्याला ही किंमत असते
व्यत्यय नको म्हणतो त्याचा प्रत्यय येतो
समाजही मूकपणे अत्याचार पहात असतो
अंधश्रद्धा रुढीना मानता बुद्धी तर्कातच फसते
आफत तब आती है जेव्हा श्रद्धाच अंध होते
आभास हा सुखाचा अहो स्वातंत्र्याला ही किंमत असते
नाजूक बंधनातून गुंफते संसाराची वीण
सहजीवनाच्या आनंदामुळे नात्यांना नाही येत शीण
नियम असतात खेळांना तेव्हाच खेळण्यात गंमत असते
आभास हा सुखाचा अहो स्वातंत्र्यला ही किंमत असते.
विवाह हा संस्कार आहे विचार हा जुनाट वाटतो
अंतिम संस्कार ही धड नाही आयुष्याचा नायनाट होतो
नात्यांमध्ये जेव्हा काही सत्वच नसते
स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी तुमचे अस्तित्वच नसते