स्त्री साहित्य

जपा तीन रूपे ही स्त्रीची

आई देते बालपण निरागस 

पत्नी जागवते खरा पुरुषार्थ 

मुलीचा अल्लडपणा जपताना

कळतो खरा आयुष्याचा अर्थ..

आई शिकवते आयुष्याचे धडे 

पत्नी सुनावते कधी बोलही खडे 

मुलीचा जन्म होतो तेव्हाच 

घरात वाजती सनई चौघडे 

आई म्हणजे देवाचे स्वरूप .

पत्नी तर असते अर्धांगिनी 

संसाराचे चक्र चालवत येते

मुलगी घरी लक्ष्मीच्या पावलांनी 

जपा तीन रूपे ही स्त्रीची

न लगे ते कर्मकांड अवडंबर

विणत जाती धागे आयुष्याचे

जगही फुलेल कसे ते सुंदर

पृष्ठे: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD