हा घास काऊचा हा घास चिऊचा

म्हणत आई भरवते बाळाला

किती खोलवर याचा अर्थ

कळत नाही प्रत्यक्ष काळाला

घास तुझा एकट्याचा नाही

स्वार्थी अधाशी राहू नकोस

चिमणी पिल्लाचे नातेही तेच

घरट्यातली ऊब विसरू नकोस

काटक्या गोळा करत करत

बांधले चिमणीने सुंदर घरटे

अनुभव गोळा करत करत

आयुष्य सुद्धा असेच असते

त्या घरट्याला झाडाचा आधार

ते झाड कधी तू तोडू नकोस

निसर्ग शिकवतो भरभरून प्रेम

ते प्रेम कधी तू सोडू नकोस

प्रतिक्रिया व्यक्त करा

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD