
करूनिया श्रीरामास नमन , म्हणे परमभक्त हनुमान
मनी माझ्या एक प्रश्न, कृपादृष्टी असावी
जानकी ही झाली प्रसन्न, म्हणे तू सागर गुणज्ञान
हृदयस्थ तुझ्या नारायण, तुजसी काय शंका
अचानक रस्त्यारस्त्य़वरी, मंदिरी नि माध्यमावरी
कशी नेते मंडळी सारी , भजतात चालीसी
बोलती ते यातना, कष्ट ही पाहवेना
भक्त्तिबहर ओसरेना, नयनी दाटती अश्रू
किती शिवभक्त भाविक , राम दर्शनासाठी उत्सुक
हिंदुत्वाचे आम्हीच रक्षक , चढाओढ चालतसे
ज्यावरून झाले नाव भारत, आपला भ्राता जो भरत
त्यास कोणी नाही स्मरत, प्रभू ही कैसी लीला
हसून बोलती रघुनंदन, प्रत्येकासी हवे ते सिंहासन
पादुका ठेवूनी विनम्र शासन, कोणास हवे कलियुगे
नको चर्चा तत्वांची, नाही परीक्षा ही स्वत्वाची
वेळ ही निवडणुकीची , अल्पबुद्धींचा हा खेळ
यावर आपले मत नोंदवा