चित्रपट सृष्टीत निर्माते होते कलाप्रेमी गुणवंत
फाळके शांताराम झाले येधे वाटेल त्यांस ख॓त
तिथे ग्लॅमर ची कीड आज लागली
कशी बॉलिवूडने थट्टा आज मांडली
पैसा फेकताच होतो दुबईला नंगा नाच
रखेली बनली त्यांची पुरवता हौस मौज
कास्टिंगकाऊच बनला पहा रीती अन् रिवाज
कला आणि सौंदर्याची आराधना आता थांबली
सत्तेचा माज सारा ना कोणाची फिकीर
गुन्हेगारांचे बायोपिक आणि ड्रग्सचा व्यापार
खुनाचा ही चाले खेळ पैशाचा अपहार
नशा पिऊनिया सारी सृष्टी अशी झिंगली
पोकळ वासे घराचे नुसता झगमगाट
आशा ठेउनी येती नवे शोधती स्वतःची वाट
भुलभुलैया सारा येथे होती अचंबित
स्वप्न कोवळ्या मनातील कितीतरी हो भंगली
यावर आपले मत नोंदवा