माणूस झाला नुसता आळशी…
विज्ञानाने प्रगती केली ऐसी
माणूस झाला नुसता आळशी…
एक काम स्वतःला धड जमंना
लिहिता वाचता बोलता येइंना
यंत्राविना पान जरा पुढं हलंना
गावाला वळसा काखेत कळशी.
माणूस झाला नुसता आळशी…
सगळ्याशी रिमोटवरच खेळणे
युट्युब इन्स्टा डेटा फक्त चाळणे
जीवनअनुभवाशी नाही घेणे देणे
कोरड्या इमोजीसाठी नुसता अधाशी
माणूस झाला फक्त आळशी
गहाण बुद्धी नाही स्वतःची अक्कल
ना स्वतःचा विचार ना लढतो शक्कल
कॉपी पेस्ट सारी आयुष्याची नक्कल
बसल्या जागेवर तू किती रे पळशी
माणूस झाला नुसता आळशी…