रोज नवा शकुनी
Everyday a girl falls victim to sexual assault who plays dirty tricks.

रोज नवी द्रौपदी, रोज नवा शकुनी
दु:शासन रोज नवा, फासाही अपशकुनी ।
कधी आश्रम अनाथ, कधी राजमहाल
दावी कधी आमिष , कधी करि हालहाल
अहंकार वर्चस्वाचे भूत नाचे थैमानी ।
मास्तर कधी शाळेत, कधी गुरु अध्यात्माचा
आश्रयदाता कधी, कधी निर्माता नावाचा
कलंक कपाळी दिसे फाटक्या बुरख्यातूनी ।
देह मानवाचे परि क्रुत्य हे राक्षसाचे
नरकात ना स्थान न फेडता रुण आईचे
सुटकाही न व्हावी यांची मरण यातनातूनी