ग्लॅमर गर्ल

दरवर्षी होतो माझा नित्यनेमाने घटस्फोट
तरीही म्हणते मी इंटरनेटवर मीच गर्ल हॉट
मधुचंद्रास जाताना सुद्धा हवा मला कॅमेरा
कधी वाटते थ्रिल कधी पत्रकारांचा ससेमिरा
सुखही नाही अनुभवत तरी देईन सीन खरा
अतृप्ततेचा भाळी शाप अधांतरी जाते वाट
नाही कुटुंबवत्सलता नाही जिव्हाळ्याचे सुख
पटलावर येते नवी सरते मग माझी ओळख
ठाकता दुःख उभे कधी दाटतो उरी काळोख
स्पर्धायुग म्हणती यासं सारे काही झटपट
द्रोपदीचे रूप माझे मांडिती पुन्हा ते द्यूत
मानसन्मान कसला स्त्री दाक्षिण्य टोपलीत
येणार नाही कान्हा मीच जाते भरसभेत
सौंदर्याचा माझा की रे दिखाऊपणातच शेवट