ब्रेन वायरिंग च आज बदलते आहे

कुठेतरी काहीतरी चुकते आहे, ब्रेन वायरिंग च आज बदलते आहे
माहितीच्या महाविस्फोटातून
माध्यमातून आदळणाऱ्या गोंगाटातून
मायेचा स्पर्श मात्र पुसत जातो तेव्हा
कुठेतरी काहीतरी चुकते आहे,ब्रेन वायरिंग च आज बदलते आहे
प्रिय कराच्या स्पर्शाने मोहरून जाण्यापूर्वी
इंस्टाग्राम च्या हॉट फोटोवरचे हिट्स किती
हे जास्त महत्वाचे ठरले तेव्हा
शृंगारातला अर्थच नाहीसा होतो अन्
कुठेतरी काहीतरी चुकते आहे, ब्रेन वायरिंगच आज बदलते आहे.
रडणाऱ्या बाळाला पोटाशी घेऊन
मायेचा पाझर फुटण्यापूर्वी
हातात मोबाईल सरकवतात तेव्हा
वेळेचे गणितच बिघडते आहे
कुठेतरी काहीतरी चुकते आहे., ब्रेन वायरिंगच आज बदलते आहे
असहाय्य स्त्री जवळच्या पुरुषाला
दादा मदतीचा हात द्या म्हणण्यापूर्वी
फेसबुकचा आधार घेते तेव्हा
विश्वास माणुसकी वरचा उडतो
कुठेतरी काहीतरी चुकते आहे, ब्रेन वायरिंगच आज बदलते आहे
मायेविना ड्रग्स ला कवटळणाऱ्यांना
गर्तेतून बाहेर काढण्यापूर्वी
समर्थनाचे ट्विट्स व्हायरल होतात तेव्हा
मंद अंध धुंद चेकाळतो आहे
कुठेतरी काहीतरी चुकते आहे, ब्रेन वायरिंग च आज बदलते आहे
काळ बदलतो व्याख्या बदलतात तशा
बदलत नाही मानवी स्पर्शाची भाषा
पण संवेदनाच जेव्हा मरून जातात तेव्हा
चेहरा फक्त भेसूर होतो आणि नकळतच
कुठेतरी काहीतरी चुकते आहे, ब्रेन वायरिंगच आज बदलते आहे