रोबोट ने केले सिझरियन 

इन क्यूबटर मध्ये पाळणा‌ हलला

बारशाआधीच मोबाईल नंबर 

ए‌आय ठरवतो दुधाचा प्याला

मॅटरनिटी पॅटर्निटी लिव्ह तर

एका दिवसात संपून गेली 

बॅकलॉग भरायला 90 तासांचा 

पती-पत्नी दोघ सज्ज झाली

यंत्रवत झालेल्या इंडस्ट्रीमध्ये 

मोजायची कशी प्रॉडक्टिव्हिटी 

आयुष्याचा अर्थच संपतो कधी 

सरतात जेव्हा जिव्हाळा प्रीती

जीव घेण्या स्पर्धेमध्ये सांग देवा 

बॅलन्स ठेवत जगायचे कसे 

माणसा अरे, लाईफ आधीच संपले 

फक्त ठरवतोस तू मरायचे कसे…

3 प्रतिसाद ते “जीव घेण्या स्पर्धेमध्ये”

  1. RAJEEV KADAM अवतार
    RAJEEV KADAM

    व्यावहारिक आणि व्यावसायिक जगात , जीवनाची वास्तवता आणि अगतिकता …

    Like

  2. ratnakar pilankar अवतार
    ratnakar pilankar

    Too good unique

    Like

Leave a reply to ratnakar pilankar उत्तर रद्द करा.

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD