
रोबोट ने केले सिझरियन
इन क्यूबटर मध्ये पाळणा हलला
बारशाआधीच मोबाईल नंबर
एआय ठरवतो दुधाचा प्याला
मॅटरनिटी पॅटर्निटी लिव्ह तर
एका दिवसात संपून गेली
बॅकलॉग भरायला 90 तासांचा
पती-पत्नी दोघ सज्ज झाली
यंत्रवत झालेल्या इंडस्ट्रीमध्ये
मोजायची कशी प्रॉडक्टिव्हिटी
आयुष्याचा अर्थच संपतो कधी
सरतात जेव्हा जिव्हाळा प्रीती
जीव घेण्या स्पर्धेमध्ये सांग देवा
बॅलन्स ठेवत जगायचे कसे
माणसा अरे, लाईफ आधीच संपले
फक्त ठरवतोस तू मरायचे कसे…
यावर आपले मत नोंदवा