नेहमी खरे बोलावे असं कोणाला जमतं

खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत 

कावळा चिमणीची गोष्ट असते हो कुठे ‌खरी

भेटते कुठे आयुष्यात पंख लावूंन सोनपरी 

कान्ह्याने पळवले लोणी थोडीच असते  चोरी

बाळाचं नटखट रूप असतं ‌ आईलाही संमत

खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत 

मित्र-मैत्रिणींमध्ये केलीस तू थट्टा मस्करी 

लटक्या रागाविना आनंद काय संसारी

कल्पनाच असते यशाची पहिली पायरी

स्वप्नांवरच जगतो माणूस त्याविना नाही करमत

खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत 

खोटे कधी बोलावे फक्त दुःखावर फुंकर

भस्म अंगारे लावून नको कुठला चमत्कार 

देवळाच्या गाभाऱ्यात नको खोटा नमस्कार

निर्मळ भाव मनी नको कोणाची फसगत

खऱ्यापलीकडेच आहे खरी आयुष्यात गंमत 

“खऱ्यापलीकडेच आहे गंमत” ला एक प्रतिसाद

  1. ratnakar pilankar अवतार
    ratnakar pilankar

    वाह फारच छान

    Like

Leave a reply to ratnakar pilankar उत्तर रद्द करा.

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD