
यश हवं प्रत्येकाला पण यश काय असतं
आपापल्या नजरेप्रमाणे रूप त्याचं बदलतं
पारितोषक मिळवून सुद्धा कुणी होतं निराश
काठावर होऊन पास कुठे दिव्यांची आरास
कुणा संपत्ती हव्यास कुणा अध्यात्म्याचा ध्यास
कुणा दिसतं यश दुसऱ्याच्याही यशात
आपापल्या नजरेप्रमाणे..
कुणाच्या संसारात चालतो नेहमी चढउतार
प्रसिद्धी शिखरावरून होतो कोणी पायउतार
तराजूत मोजती यश करती कोणी व्यापार
देवच करेल निवाडा अशी कोणाची समजूत
आपापल्या नजरेप्रमाणे…
धडपड करून तुम्ही काही जे मिळवता
आईला अर्पून ठेवतो चरणी तिच्या माथा
तोच खरा आनंद तीच असते यशोगाथा
सार्थक आयुष्याचं वाटतं मन होतं तृप्त
आपापल्या व्याख्येप्रमाणे…
यावर आपले मत नोंदवा