
देवाने माणसाला दिले सारे जग
जा तू पृथ्वीवर आणि आनंदाने जग
सगळ्यात मोठी देणगी तुला दिला वेळ
वापरतोस तू कसा हाच खरा खेळ…
खेळ लोकांना समजत नाही
काय करावे उमजत नाही
कुणी नशिबावर रडत असतात
जुन्या गोष्टींवर कुढत बसतात
एक दुसऱ्यावर चिडत असतात
कशावरून तरी नडत बसतात
अहंकाराने फडफडत असतात
ढोल स्वतःचे बडवत बसतात
थोडेच लोक धडपडत असतात
त्यातून स्वतःला घडवत असतात
तेच शिल्पकार असतात मूर्तीचे
साक्षीदार देवाच्या वचन पूर्तीचे
वेळ सांगून येत नाही
मेळ कसला बसत नाही
देवाकडे काय मागतोस
नवसाचे कसले बोल
दिले ते सत्कारणी लाव
वेळच आहे अनमोल
Leave a reply to RAJEEV KADAM उत्तर रद्द करा.