द्रौपदीचा विजय

शतकांच्या कष्टातून उभरते एक कर्मयोगी महिला
द्रौपदीच्या विजयामुळे इतिहास नवा घडला
लोकशाही रुजत जाते सर्व स्तरातून
दुर्बलतेचा शाप सरतो जागृत अभिमान
हा विचार समरसतेचा
हा विजय संघटनेचा
हा विश्वास जनसामान्यांचा
अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा आज साजरा झाला
अखंड यत्नातून वाढवू आम्ही देशाची शान
परंपरेचा वारसा चालूनी मिळवू मानाचे स्थान
ही जाणीव कर्तव्याची
ही पूजा अग्नी दिव्याची
ही आशा भवितव्याची
विश्व शांतीचा दूत बनण्यासी भारत सज्ज झाला..