राजकीय

लोकशाही झाली झुंडशाही

उषःकाल होता होता काळरात्र झाली कधी ते कळलेच नाही 

लोकशाहीची झुंडशाही झाली कधी ते कळलेच नाही….

शतकांच्या गुलामी नंतर सरला होता अंधकार 

स्वातंत्र्याचा उद्घोष होता वंदे मातरम जयजयकार 

पिढ्या पिढ्या चालले होते यशस्वी ते संगर

विचार त्यांचे पुसले गेले कधी ते कळलेच नाही

लोकशाहीचे उभवायचे होते एक भव्य मंदिर

लोकशिक्षण जनजागृती करायचा समाजाचा  आधार 

परंपरा जपत करता सीमांचा ही विस्तार

मतांच्या बेरजेत तुकडे  झाले कधी ते कळलेच नाही. 

उगवले बुरशी वाणी जाती धर्मांचे स्वार्थी गट

शकुनीचे फासे खेळती मांडती नवे द्युतपट

फितूरीचा शाप पुन्हा शत्रू बरोबरच आखती कट

विश्वासाला तडे गेले कधी ते कळलेच नाही 

नुसती चिखल फेक राजकारण बनले आखाडे

अतिरेकी घुसखोरी दिसेना डोळ्यावर की झापडे

वाचाळ बनती विद्वान लचके तोडती गिधाडे 

स्वप्ने घायाळ झाली कधी ते कळलेच नाही.

पृष्ठे: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD