तुमच्या गिरणीचा वाजू द्या भोंगा
तुमच्या गिरणीचा वाजू द्या भोंगा
हातातून गेली सत्ता, जीव माझा जाळी
पक्ष कसा माझा फुटला, रोज रात काळी
बुद्धी माझी कशी जाते आज वाया
सरली ऊब सारी हरवली मग माया
आता किती कळ काढू कुणी मला सांगा
तुमच्या गिरणीचा वाजू द्या भोंगा…
राजकीय कोंडमारा
अकलेच्या तोडी तारा
जीभ चाले चराचरा
रोज सकाळी पत्रक, गरळ नवी ओका
तुमच्या गिरणीचा वाजू द्या भोंगा….
ऊर खालीवर फक्त प्रसिद्धीची धडपड
लक्ष देईना कोणी होई पंखाची फडफड
बडबड केली किती गळती काही थांब ना
सत्तेची गं वाट दूर रात आता सरना
तोल सावरू कसा मत्सराचा छेडी भुंगा
तुमच्या गिरणीचा वाजू द्या भोंगा….