देणाऱ्याने देत जावे
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
मुख्यमंत्र्यांच्या निधीतून
लाडक्या बहिणीसाठी स्कीम घ्यावी
पक्षांच्या जाहीरनाम्यामधून
सवलतींची नवीन थीम घ्यावी
कधी साडी कधी टीव्ही सेट
कधी कर्जमाफी कधी दिवाळीची भेट
युती आघाडी असेल जशी
मागण्यांचा तसा होईल समेट
मतांच्या गणितातून
कुणा जातीला आरक्षण द्यावे
कायद्यालाच विरोध करून
कुणा गुन्हेगारांना संरक्षण द्यावे
इंधनाच्या दरवाढीतून
कोणाला विजेची सूट द्यावी
खोट्या लाभार्थ्यांची यादी बनवून
बजेटमध्ये आधीच तूट हवी
धर्मनिरपेक्ष या देशांमध्ये
धर्मगुरूंसाठी भत्ता हवा
अवैध घुसखोरांना रेशन कार्ड
फुकट द्यावा पत्ता नवा
खटाखट आश्वासने देताना
कुणाच्या बापाचे काय जाते
पुढच्या पिढीची सोय करताना
उघडू नवीन स्विस खाते
गरिबांसाठी निवडणूक लढवताना
इतकी श्रीमंती कुठून आली
एवढ्या मागण्या पुरवताना
द्रौपदीची रिक्त झाली थाळी
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
निवडणुकांनंतर उत्तरे ऐकून
ते हात कपाळावर मारावे