राजकारणाचा चेहरा आज अति भेसूर

राजकारणाचा चेहरा आज अति भेसूर
दुर्घटना होवो किंवा अत्याचार नारी वर
संधी सापडली कशी हर्ष तो अनावर
जात धर्म प्रांत शोधा कोण सत्तेवर
अश्रु मगरीचे रडण्यात नाही काही कसूर
नाहीशी संवेदना अब्रू ही चव्हाट्यावर
नजर फक्त आहे फायदा आणि तोट्यावर
धिंड लोकशाहीची बहुमताच्या काट्यावर
उत्सव दुर्गेचा पाठीशी घालू महिषासुर
स्वातंत्र्य कशासाठी त्याचा पूर्ण विसर
मूल्य तुडवूनि हो पक्ष हिताचा गजर
जखमेवर फुंकर कुठली करू या बाजार
सत्तेच्या भुकेपोटी जन्मती फक्त भस्मासुर