गळ्यात साखळी ‘सोनिया’ची:-

गळ्यात साखळी ‘सोनिया’ची ही पोरे कोनाची
नाव बी बुडली नाविक भरकटला भीती बुडण्याची
घराणं चालेना वारस मिळंना पुण्याई कशी थाटायची
पतपेढी चालंना मतपेढी मिळंना तत्व काय चाटायची
गळ्यात साखळी …
नाव बी बुडली …
साथी मिळंना गठबंधन टिकंना मते कशी जोडायची
बहुमत येतं जवळ हाती पण कला नाही फोडायची
गळ्यात साखळी ..
नाव बी बुडाली ..
जमीन दिसंना लाट ओसरंना खात्री हरण्याची
पंजा अमित शहाचा देठ कमळाचा आशा एक तरण्याची
गळ्यात साखळी ..
नाव बी बुडाली ..:-