वेडात मराठे पुन्हा दौडावे साथ:-

वेडात मराठे पुन्हा दौडावे साथ
विसरावा पक्षाचा झेंडा विसरावी आपली जात
तो चालतो कुरघोड्यांचा अंन सत्तेचा खेळ
पक्षापक्षांचा नाही आपसात आज मेळ
साधली शत्रूने पुन्हा बेसावध ती वेळ
शूर महाराष्ट्रात औरंगजेबास प्रणिपात
नको आता शब्दांच्या छटा या नाना
घुसा छावणीत भेटा थेट गनिमाना
फेका अंहंकार जपा आपल्या अभिमाना
काळाची हाक ही करा आता आघात
दाखवा एकजूट स्वीकारा नवे आव्हान
गड किल्ल्यावरून ऐकवा स्वातंत्र्याचेच गान
नोंदवा इतिहासावर नवे सोनेरी पान
मिळेल तेव्हाच तुम्हास महाराष्ट्राचा आशीर्वाद
…. सर्व राजकीय पक्षांनी आता मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी लढावे…:-