
आयुष्याचं कोडं सोडवता सोडवता
आयुष्याचंच सारं code झालं .
घरचं झालं थोडं आणि
AI चे आता नव घोड आलं..
खरं खोटं सारं काहीच समजेना
आभाळाएवढे सत्य आभासात दिसेना
यंत्रवत माणसाला भविष्य उमगेना
भाग्यरेखा गेली कपाळी bar code आलं
घरचं झालं थोडं आणि
AI चं आता नवं घोडं आलं…
उधळलं घोडं कुठे ते अडेना
लगाम घालण्यासाठी उपाय सापडेना
नाळ तुटली मातीशी नातं कशाशी जडेना
सोपं सोपं करता सारं काही explode झालं..
घरचं झालं थोडं आणि
AI च़ आता नवं घोडं आलं..
यावर आपले मत नोंदवा