तप करण्यासाठी जे वन तेच आहे खरे तपोवन
श्रीराम सीताच्या चरणस्पर्शाने ते झाले रे पावन

वृक्षवल्ली वनचरी सोयरी तेच आहे साधू ग्राम
माझ्या तुकयासाठी आकाश मंडप पृथ्वी आसन

कुंभमेळासाठी निसर्गनाश हा मोठा विरोधाभास
निसर्गाशी ना एकरूपता तो अध्यात्माचा आभास

शहरे झाली भकास सर्वत्र प्रदूषणाचा विळखा
निसर्गाचे स्वतःचे नियम काळाची हाक ओळखा

प्रेम पर्यावरणाचे नका समजू दबावाचे तंत्र
वसुधा हेच कुटुंब हाच हिंदुत्वाचा खरा अर्थ

करू झाडांचे पुनर्वसन यावर नाही विश्वास
आधीची आश्वासने मोडली कोंडतो आता श्वास

देवेंद्र गिरीश नावातही निसर्ग करा हो ती सार्थ
अहंकार अट्टाहास सोडावा टाळावा तो अनर्थ…

कोणत्याही कारणावरून नाशिक‌ तपोवन येथे एकही झाड तोडले जाणार नाही अशा कोणाच्याही भूमिकेला पूर्ण पाठिंबा…. आणि एकमतच व्हावे ही इच्छा…

यावर आपले मत नोंदवा

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD