मोदीला हरवायचं कसं ते नाही ठावं
चला गड्यांनो खेळूया रडीचा डाव …
सेक्युलर शब्द चालेना ना पिडीए कार्ड
सीएए पास झाले रजिस्टर करा वक्फ बोर्ड
जाती आरक्षण प्रांत भाषा कोरडी बडबड
हताश झाले सारे हात टेकती रंक नि राव
चला गड्यांनो खेळूया आता रडीचा डाव
ईव्हीएम ना ठरते खोटे ना तुरुंगात सरकार
संविधानात होईल भीती समजे निराधार
आदळ आपट बागुलबुवा आंदोलने ती बेकार
गाझा पट्टी चीन ट्रम्प नावे केली कावकाव
चला गड्यांनो खेळूया आता रडीचा डाव
गोळा करा खोटे आकडे मांडा खोटे गणित
संशयाचे वलय करावे अधिकाऱ्या अपमानित
तळमळ नवे कट कारस्थान सर्वा माहित
कच्चे धागे जोडून या बनवा खोटे नरेटिव्ह
चला गड्यांनो खेळूया आता रडीचा डाव
यावर आपले मत नोंदवा