व्हर्चुअल देव्हार्यात व्हर्चुअल मूर्ती
व्हर्चुअल उदबत्तीसह व्हर्चुअल आरती
नको उपासतापास नको तीर्थ पर्यटन
खाटेवर बसून मोबाईलवर देवदर्शन
ना व्रतवैकल्य ना प्रायःश्चित्त पश्चात्ताप
इमेजेस खंडीभर पुण्य पदरी आपोआप
नको टाकीचे घाव हवे मेमरी कार्ड
देखल्या देवा दंडवता आधी मेसेज फॉरवर्ड
कसे तरंगावे अभंग कशी चालावी भिंत
दर्शन दिव्य प्राप्तीसाठी हवी थोडी बँडविड्थ
मूर्तीपेक्षा सुंदर असावी ती सजावट
प्रसाद ठेवा बाजूस आधी नैवेद्याचे ताट
मोदकावर तूपाची धार उधळावा गुलाल
आशीर्वाद मागावा वरुनी जिओ तेरे लाल
रचना – माधव कुलकर्णी
यावर आपले मत नोंदवा