भांडण कशावरूनही कराव
भाताच्या शितावरून, शिळ्या कढीच्या ऊतावरुन
जात्यातल्या पिठावरुन, भाजीतल्या मिठावरुन
लग्नातल्या साडीवरून, गॅरेज मधल्या गाडीवरुन
हॉटेलच्या खाण्यावरून, सिनेमातल्या गाण्यावरून
वादळातल्या पेल्यावरून, ऑफिसमधल्या चेल्यावरुन
चौपाटीवरच्या भेळेवरून , चुकलेल्या वेळेवरून
सहलीच्या ठिकाणावरून, ट्रेन की विमानावरून….
भांडण करू नये
मुलांच्या चुकांवरून , पालकांच्या शंका वरुन
दिलेल्या रुपावरुन , कमावलेल्या रुपयावरुन
पूजेच्या पाटावरुन नैवेद्याच्या ताटावरुन
जोडीदाराच्या चारित्र्यावरून , संसाराच्या पावित्र्य वरून
बाकी भांडण करावे कुठली आहे विषयावरून
भांडूनच होत जातो व्यक्तिमत्वाचा विकास
वाढत जाते परस्परांची ओढ अन् आस
भांडनूच होत जाते नकळत स्वप्नांची पूर्ती
टाकीचे घाव सोसल्याशिवाय बनत नाही हो मूर्ती
यावर आपले मत नोंदवा