पतीचे प्राण झाले हरण, तरीही सोडीना ती चरण,
यमही जाई शरण, भक्तिभाव श्रेष्ठ
स्त्रीचे स्थान नाही दुय्यम, परि संसारात पाळीता संयम
प्रसन्न होई प्रत्यक्ष यम, हाचि अर्थबोध
पतीसही पत्नीची जाण, आयुष्यात देई मानाचे स्थान
तिला करता सर्वस्व दान, साथ होतसे द्रुढ
पती-पत्नी जपता नाती, चालत येते मग समृद्धी
समाजात नांदे सुखशांती, सृष्टी आनंदी
व्रत ही वटसावित्रीचे, रक्षण व्हावे पर्यावरणाचे
शीतल प्रेम पौर्णिमेचे, जावे पूर्णत्वासी….
यावर आपले मत नोंदवा