फिरत्या व्हॅन वरती देसी बातमीला आकार
मिडीया तुझा वेडा पत्रकार
खोट्या मुलाखती कधी घोटाळा
तूच मिसळशी सर्व मसाला
ब्रेकिंग न्यूज मग ये जन्माला
तुझ्या अनैतिकतेला नसे सीमा नसे काही सुमार
घटा घटांची बातमी वेगळी
अति कष्टाने तू उतरवशी गळी
कळेना तुज तुझी प्रतिमा डागाळली
गुन्ह्यास सदा घालूनी पाठी करिसी असत्याचा जुगार
तूच बनवीशी तूच बनशी
कुरवाळिसि तू गर्तेतच बुडसी
न कळे यातून कुठले हित जपसी
फिरविसी कॅमेरा परि दिसे इतरा तयामागे अंधार
यावर आपले मत नोंदवा