मंदिराची राजनीति स्मारकासाठी बजेट
शिकवण विसरा ती, जातिघर्माचा समेट
समानतेचे सूत्र हाती तलाका भोवती धरा फेर
इमामास देता भत्ता , दहीहंङीत नवा थर
डीजेच्या तालावर, चाले देवीची आरती
आश्रमातील किंकाळी, गोंगाटात विरुन जाती
पादत्राणे काढता बाहेर, सत्संगाची मनी भीती
विटाळ की विटबना , पदोपदीी विसंगति
दर्शनाचे प्रदर्शन रोज, भक्तांचे जमती थवे
देव्हार्यात नाही देव, आरासात नवे दिवेे
यावर आपले मत नोंदवा