अंताक्षरीच्या खेळावरुन सुचला सहजच एक शब्द अ-कारण
अ-कारण म्हणजे काय, ज्याला कारण नाही ते, अनाथ , अद्रुष्य , अ हा जणू अभाववाचक शब्द आहे, हा आभास की सत्य ह्याचा शोध घेताना उलगडतात अ चे अनेक अर्थ
अ कारच ब्रह्मा उ कारच विष्णु असे ज्ञानेश्वरांनी ओंकार स्वरुपाचे वर्णन केले आहे . ह्या ब्रह्मांडाचे दर्शन होते ते आईमुळे .
तिच्या अंगाईगीतातून उमटत जाणारा आतला आवाज रुजतो खोलवर .
आजी आजोबांच्या खांद्यावर खेळत आकाशातले तारे मोजताना मनात आकारते नवे भावविश्व. अंगणातल्या
वेली, रुसलेली अबोली अन् तळ्यातला औदुंबर अजाणतेपणे अलगद प्रवेश करतात अंतरंगातच .
अन् उंबरठ्या पलिकडे दिसू लागते नवे जग .
आश्रम नावाची संस्क्रुती अस्तित्वात नसली तरीही अंधारातून उजेडाकडे नेणारा विद्येचा अंकुर रुजतो शाळेच्या जीवनात .आयुष्याची ग्रुहीतके अाणि व्यवहाराची गणिते चुकुनही टिकून रहाते हीच एक आक्रुती .
अस्मितांच्या जांणीवातून, अभंगाच्या तालातून, संगीताच्या आरोह अवरोहातून, प्रेयसीच्या अधरातून,अबब – अय्या, अरेच्च्या अशा उद्गारातून घडलेले प्रवास येऊन ठेपतो अर्थ आणि उद्योग जगतात . आज-आधी-आता-असेच हे शब्द अधोरेखित करत उलटतात आठवडे अन् वर्षे .
अपार कष्टावर हळुवार फुंकर घालत अर्धांगिनी आणि व्यापते अर्ध आयुष्य .
आडवळणातून, उभ्या आडव्या रेषातून, अनेक उलथापालथीतून एक धागा सुखाचा शोधता एक एक आप्तजनांचा विरह येतो वाट्याला . डेोळ्यातले आसू अन् उरी दाटलेली दु:ख ओसरले तरीही अ ची सुटत नाही साथ अंतापर्यंत
अनंतात विलिन होऊन अस्थिविसर्जना सह सारी उत्तर क्रिया होईपर्यंत रहातो हा अ.
निर्विकार, निराकार, व्यंजन रहित , अलंकार रहित एक ध्वनि, एक सत्य, अव्यक्त
यावर आपले मत नोंदवा