व्यसनांच्या विळख्यातून
गॅंगस्टरच्या गोंगाटातून
बाॅंबस्फोटाच्या साखळीतून
धापा टाकत सावरत होती
एक लंगडी जख्खड म्हातारी
नाव तिचे हो मुंबापुरी ।
लबाड लेकरांनी लुबाडले का रे
घर अंगण तिचे उजाडले सारे
छप्पर उडले पाऊस ना ओसरे
आनंदाहून उरी आज धडकी भरे ।
कुठे लागेे आग कुठे पडे ते विमान
फाटे कुठे धरती, गडगडे आसमान
पडे कुजवले झाड, पडे पूल पादचारी
आसरा देतेे माय, आसराच शोधे बिचारी ।
आखडल्या धमन्या गलित आज गात्र
धडधडे ह्रुदय म्हणूनि जीव नाम मात्र
आकुंचिती फुफ्फुसे कोंडतो तिचा श्वास
टाळ्या पिटवून म्हणती झाला पहा विकास ।
यावर आपले मत नोंदवा