स्फुटलेख

नटसम्राट चालूच आहे

नटसम्राट चालूच आहे:-

Add Your Caption Here

होय तुम्ही तरुण आहात, म्हणजे तुम्हाला रंगवता येतो श्रुंगाराचा कल्पनाविलास स्क्रीन वरच्या मादीशी.

म्रुत्युवर जीवनाची मात करणारा स्त्री पुरुष मीलनाचा अर्थ अनुभवण्याआधीच व्यक्तिगत अस्मितांचे  अहंकार अन् घटस्फोटाचे अर्ज जपणारी तुमची जमात़

आपल्या फेसबुकवर आपलीच सेल्फी अपलोड करत आत्ममग्न आयुष्य जगताना ,जीवनाशी नाळ कधी तुटून पडली हेच जिथे समजत नाही, तिथे जन्मदात्या आईबापांची अडगळ वाटली तर आश्चर्य ते कसले ?

सोशल मिडियावर भटकणारे मदर फादर डे चे संदेश कधीतरी तुमच्याकडून आम्हांला फाॅरवर्ड होतात आणि आम्हाला वाटते, आम्ही नवीन पिढीशी कनेक्ट झालो.
बाकी आमचं आयुष्य आभासी अन् तुमचंही़.
फरक इतकाच की आमच्या आभासी रंगमंचावर वास्तवतेचे उत्कट प्रतिबिंब होते अन् ती वास्तवताच नाकारते तुमची आभासी दुनिया़

आमच्या ट्वीटरवरच्या चिवचिवटाने जाग्या होतात तुमच्या नाजूक संवेदना अन् फेक फेसबुक अकाउंटच्या बुरख्याआड दडलेले चेहरे गिधाडासारखे ट्राॅल करतात आमच्या विचारांवर .

त्या विचारांचं वादळ घोंघावतंय इंटरनेटच्या महाजालातून, सर्च इंजिनला न सापडणारे शब्दांतून, इमोटिकाॅनच्या सिंबाॅलमधूऩ, शोधतं आहे एक सोशल साइट़़
साईट बनवता का कुणी साईट़ जिथे असतील अनुभवाचे बोल, जीवनाचे संगीत, वेदनांना आसरा आणि हो एक तुळशीव्रुंदावनाचं होमपेज, सरकारांच्या आठवणीसाठी
:-

पृष्ठे: 1 2 3 4 5 6 7 8 9

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD