पाऊस येता होतील कार्ये पूर्ण काय
पाऊस येता होतील कार्ये पूर्ण काय
जन क्षणभर म्हणतील हाय हाय..
गटारे तुंबतील, दरडी कोसळतील
खड्डे पडतील, ट्रॅफिकने हवाल दिल
असेच रडगाणे पुन्हा गातील, होइल काही का अन्तराय..
नदी नाले रस्त्यावर वाहतील
कधी सागरी आक्रान्त होईल
होर्ङिंग्स उडतील्, लोकल मधून पडतील
वेदना राहील मनी, वाटेल फक्त असहाय…
राजकीय पक्ष डोळे पुसतील
थोडे अनुदान तोंडावर फेकतील
चौकशी अहवाल कागदी रखडतील
पुन्हा युत्या आघाड्या होतील, आम्हीच तुमचे बाप माय….
अतिक्रमणे चालू राहतील, विकासासाठी जमिनी हडपतील
झाडे पाडतील, तलाव बुजवतील
बाहेरुन लोंढे चालू राहतील
कुणा काळजी मुम्बई आमचि, आजच्या मतांची करावी सोय….