स्फुटलेख

पाऊस येता होतील कार्ये पूर्ण काय

पाऊस येता होतील कार्ये पूर्ण काय

जन‌ क्षणभर म्हणतील हाय हाय..

गटारे तुंबतील, दरडी कोसळतील

खड्डे पडतील,  ट्रॅफिकने हवाल दिल

असेच रडगाणे पुन्हा गातील, होइल काही का अन्तराय..

नदी नाले रस्त्यावर वाहतील

 कधी सागरी आक्रान्त होईल 

होर्ङिंग्स उडतील्, लोकल मधून पडतील

वेदना राहील मनी, वाटेल फक्त असहाय…

राजकीय पक्ष डोळे पुसतील

थोडे अनुदान तोंडावर फेकतील

चौकशी अहवाल कागदी रखडतील

पुन्हा युत्या आघाड्या  होतील, आम्हीच तुमचे  बाप माय….

अतिक्रमणे चालू राहतील, विकासासाठी जमिनी हडपतील

झाडे पाडतील, तलाव बुजवतील 

 बाहेरुन लोंढे  चालू राहतील 

कुणा काळजी मुम्बई आमचि, आजच्या मतांची करावी सोय….

पृष्ठे: 1 2 3 4 5 6 7 8 9

नमस्कार,

 माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनातून, अनुभवातून आपल्या सर्वांच्या मनात अनेक पडसाद, भावना उमटतात. त्या फक्त शब्दबद्ध करणे हा अल्पसा प्रयत्न आहे.  या प्रवासात आपण सहप्रवासी आहात याचा आनंद आहे. आपण आपली प्रतिक्रिया ब्लॉगवर जरूर नोंदवा.

नवविवाहित दांपत्याच्या स्वप्नांना अलगद उलगडत संसार सजवणारा दहा कवितांचा संग्रह आहे …. सुखचित्र नवे

.https://books2read.com/u/31AkzD