अश्रुच देतात साथ
वाहू दे कोंडले अश्रू, करा वाट मोकळी ती
अश्रुच देतात साथ आयुष्याच्या वळणावरती…..
शकुंतलेला निरोप देता कण्वांचे डोळे पाणावले
राम भरत भेटता अश्रू गाली ते ओघळले
दुःख वेदना पाहून बुद्धाचे मन कळवलंले
अश्रू म्हणजेच उत्कटता भावना निरागस ती ……
अश्रू कधी वियोगाचे असती कधी आनंदाचे
अश्रूंची होती फुले कधी अंगार ते अश्रूंचे
अश्रूंमध्ये दडले बीज युगाच्या ही निर्मितीचे
अश्रूच लाखमोलाचे याविना यात्रा व्यर्थ ती …..
चढउतार आयुष्यात होती केला किती प्रयास
वाटे कधी निराश एकटेपणाचा आभास
अश्रूच येती धावून मोकळे करी अवकाश
फिरवून आणती माघारी नवी उमेद जागविती ….