कोण व्हीआयपी आला ग बाई…
लालबागच्या वाटे भल्या भल्या पहाटे
कोण व्हीआयपी आला ग बाई…
मिडिया कॅमेरामन बोलवा ग बाई
पोलीस सुरक्षा वाढवा ग बाई
मंडपातली गर्दी हटवा ग बाई
ढोल नगारे वाजवा ग बाई
सुपरहिट सिनेमातला आला मोठा हिरो
नखरे करते नटी फिगर तिची झिरो
चर्चा रंगते मोठी चाहते यांचे किती
इंस्टाग्राम वरचे हिट्स संध्याकाळी मोजती
ब्रेकिंग न्यूज बनवा ग बाई
कोण व्हीआयपी आला ग बाई….
सहकुटुंब दर्शनाला आला बिझनेसमन
बाप्पाच्या पेटीत पडले मोठे दान
त्यावरून ठरते कोणाचे मोठे मन
मोकळा करा रस्ता गाडी अलीशान
टॅक्स माफ करा ग बाई
दात्याला दुवा पोहचू दे ग बाई
कोण व्हीआयपी आला ग बाई…..
राजकीय नेता येतो पहा दुरून
अनाउन्समेंट मोठी सर्व माध्यमातून
मूर्तीपेक्षा कट आऊट दिसावा लांबून
निरंजन दि्वे लावा ग बाई
पदर खोचून ओवाळा ग बाई
कॅमेरात नथ दिसू दे ग बाई
कोण व्हीआयपी आला ग बाई….
बाप्पाने दिला सर्वांना आशीर्वाद
नको प्रदर्शन घाला भक्तीची साद
हवा फक्त मला दुर्वां अंकुर
दूर करा तुमचा खोटा अहंकार
मीडिया कॅमेरा मन हटवा ग बाई
पोलीस सुरक्षा नको ग बाई
वहाणा पायातल्या काढा ग बाई
देवाच्या पाया पडा ग बाई