मित्रच असतो साक्षीदार

जयाविना नाही होणार कधी स्वप्न तुमची साकार
आयुष्यातील चढउतारांचा मित्रच असतो साक्षीदार
कधी आईवर रुसलास कधी परीक्षेत जरी चुकलास
कधी नोकरीत बढती कधीही नव्या बॉसचा त्रास
पसंत पडली मुलगी तिला होकार तू दिलास
पहिला श्रोता तू हक्काचा दिलास भावनांना आकार….
सहल असो वा सोहळा रंगलो त्या आनंदात
कधी चाहूल संकटाची कधी झाला दैवी आघात
मित्रच देतो खरा आधार कुठल्याही प्रसंगात
ना स्वार्थ ना लोभ ना कधी दुसरा विचार….
ना असतं कधी मित्राशी कुठलं नावाचं नातं
ना संपत्तीत वाटा ना भागीदारी व्यवसायात
ना व्यवहाराची सीमारेषा ना संकोच तो मनात
तरीही असते साथ आणि फक्त गुणांचा गुणाकार.