बाॅलिवूडचे दिवस:-
बॉलीवूड बहिष्कार
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करताना महात्मा गांधींच्या दांडी यात्रेचं स्वाभाविक स्मरण होत आहे.
उचललेस तू मीठ मूठभर , साम्राज्याचा खचला पाया असे सार्थ वर्णन त्या सर्वसामान्यांच्या सहभागातून झालेल्या निशस्त्र आंदोलनाचे केले गेले.
योगायोगाने आज दुसरीही बातमी कलाक्षेत्रामध्ये चर्चेत आहे. एकानामांकित चित्रपट निर्मात्याची कित्येक वर्षांची मेहनत पाण्यात बुडवून बहिष्कारातून कोंडी झाली आहे. सर्वसामान्यांची खरी ताकद पुन्हा एकदा बॉलीवूडच्या उन्मत्त साम्राज्याला समजली आहे.
स्वातंत्र्य आंदोलनात आणी नंतरच्या कालखंडामध्ये चित्रपट स्रुष्टीने देशाच्या उभारणीमध्ये मोठे योगदान केले. नंतर निखळ मनोरंजन, कधी मसालेदार चित्रपट रोमँटिक कथा , रहस्य पट अशा विविध विषयातून बॉलीवूडची जडणघडण झाली.
90 च्या दशकामध्ये गुन्हेगारी जगताची एन्ट्री झाली. कलाकार दुबईला जाऊन नाचू लागले. मुंबई बॉम्बस्फोटामध्ये आरोपी म्हणून सापडले गेले. तिथून सुरू झालेली घसरण काही अपवाद वगळता चालूच राहिली. पैशाचा माद , सौंदर्याचा व्यापार , समाजाला पोखरणारे विषय , कास्टिंग काऊच, अति नग्न नाच , ड्रग्जचा सुळसुळाट , देश विघातक शक्तींशी संगनमत, बहकलेली तरुणाई, घराणेशाही यामध्ये कला सौंदर्य नाहीसे होऊन झगमगाट पुढे घेत काळी कृती झाकण्यासाठी स्टेटस चा वापर होऊ लागला.
आम्हाला कोण विचारतो. राजकारणात जबरदस्त वजन आहे. पैशाचा माज आहे. मीडियावर कंट्रोल आहे. बेताल वक्तव्याचे अभिस्वातंत्र्य आहे. पैशाने काही खरेदी करता येईल असा आत्मविश्वास आहे. कुणी थोडी विचार करणारी टाळकी सोशल मीडियावरती काही माहि लिहीत असल्यास आमचेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य खरे म्हणण्याची यंत्रणा आहे. ट्रौलिंग झाल्यास अशा गावठी लोकांना सडेतोड उत्तर कसे देतो एवढे म्हणण्याचा मस्तवालपणा त्यांच्या अंगी आहे. अनेक भूमिका सजवताना खोटी सोंगे घेऊन समाजाला भूल देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. आम्ही कुठलाही विषय मांडला कुठल्याही चिन्हांचा अपमान केला तरी तो खपवून घेतला जातो, करोडो प्रेक्षकांमध्ये दीडशे दोनशे कोटी सहजच मिळू शकतात असे गणितंही आहे.
आज आपटलेला चित्रपट हा काही योगायोग नाही. कोणत्याही नायका शिवाय ,कोणत्याही शस्त्रा शिवाय , कोणत्याही दगडफेकी शिवाय ,कोणत्याही भडक घोषणांशिवाय स्व जागृतीने समाजाने अशा प्रवृत्तींकडे फिरवलेली पाठ आहे. बस झाले आता आम्ही खपवून घेणार नाही हा तो संदेश आहे. दारू पिऊन जिंकलेल्या हत्तीच्या गंडस्थळावर सर्वसामान्यांनी केलेला हा वार आहे. बदलला नाहीत तर ही बॉलीवूडच्या सध्याच्या रूपातील शेवटची सुरुवात आहे
टाकलास तू छोटासा बहिष्कार, बॉलीवूडचा खचला पाया हा विश्वास जागू शकेल अशी बीज या नव्या दांडी गुल घडली आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे धडे शिकवणाऱ्या लोकांना निशब्द अभिव्यक्ती द्वारे दुष्ट प्रवृत्तीतून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे.