हे केवळ एक टास्क असतं….

बिग बॉसच्या घरात प्रेम पहा फक्त शुष्क असतं
सहकाऱ्यांशी ओठ मिळवणे हे केवळ एक टास्क असतं….
प्रिया समोर बावरण्याचा नववधूला नसतो आनंद
नसते धुंदी फुलांना नसतात कळ्याही त्या धुंद
नसतो शुक्रतारा आकाशी नसतो वाराही तो मंद
पैसा प्रसिद्धीच्या कॅमेरा शिवाय सारं कसं वेस्ट असतं…
घरट्यात आपल्या ऊब असावी विचार हा असतो जुनाट
घर असते प्रचंड मोठे दिसतो नुसता झगमगाट
निसटत जाते सहज पायरी भटकत जाते वाट
समृद्धी आणि समाधान त्यांचं नातं व्यस्त असतं…..
स्त्रीची अब्रू येथे मोजतात ते तराजूत
कवडी झाली मोठी तरी सारे कवडी मोलात
वापरा आणि फेका हीच प्रवृत्ती असते बाजारात
नशा उतरताच ग्लॅमरची मग जगणंच निरर्थक असतं